हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

कमर्शियल वीज मीटरसाठी लाच स्वीकारतांना वायरमन एसीबीच्या जाळ्यात

नरडाणा/- कमर्शियल वीज मीटर बसवून देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना नरडाणा उपविभाग, ग्रामीण कक्ष क्रमांक एक येथे कार्यरत वायरमन साहिल मेहमूद मन्यार (वय २१, रा. शिंदखेडा) यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून अटक केली. या कारवाईमुळे लाचखोर कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांच्या बहिणीचे नरडाणा येथील गांधी चौकात ग्रामपंचायतीच्या जागेत ब्युटी पार्लर असून, त्या ठिकाणी वाणिज्य (कमर्शियल) वीज मीटर बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे व कोटेशन २४ डिसेंबर रोजी सादर करण्यात आले. मात्र, कागदपत्रे पूर्ण असूनही वीज कनेक्शन जोडण्यात आले नाही. त्यामुळे तक्रारदाराने वारंवार पाठपुरावा केला.या दरम्यान मंगळवार, ६ जानेवारी रोजी वायरमन साहिल मन्यार यांनी फोनद्वारे पाचशे रुपयांची लाच मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचला आणि लाच स्वीकारताच संबंधित वायरमनला रंगेहात अटक करण्यात आली.अटक केलेल्या आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, सुधीर मोरे तसेच जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!