हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूर शहरात एकाच रात्रीतून नेक्सॉन व हॅरियर कार अज्ञात चोरट्यांकडून लंपास

शिरपूर (प्रतिनिधी) शहरात कार चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडत एकाच रात्री दोन महागड्या चारचाकी वाहनांवर हात साफ केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. बालाजी नगर व करवंद रोड परिसरातून टाटा कंपनीच्या नेक्सॉन व हॅरियर या दोन कार चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी बालाजी नगर, स्वामी नारायण मंदिराजवळ भाड्याने राहणारे बँक मॅनेजर प्रसाद भिकन दुसाणे वय ३६ यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची सन २०२३ मॉडेलची टाटा नेक्सॉन (ग्रे रंग, क्र. MH-19 EA-6125 ही कार १ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता घरासमोर अंगणात उभी केली होती. मात्र २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता उठल्यानंतर कार जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोध घेऊनही कार मिळून न आल्याने त्यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.याच दरम्यान पोलीस ठाण्यात आलेले शुभम दीपक रणदिवे (रा. कृष्णा व्हॅली, करवंद रोड, मांडळ शिवार) यांनीही असाच प्रकार घडल्याची माहिती दिली. त्यांची सन २०२० मॉडेलची टाटा हॅरियर (पांढरा रंग, क्र. MH-41 BD-0575) ही कार देखील २ जानेवारी रोजी सकाळी घरासमोरून चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले.दोन्ही वाहनांची एकूण अंदाजे किंमत सुमारे ७ लाख रुपये असून अज्ञात चोरट्यांनी रात्री १० ते सकाळी ७ वाजेदरम्यान ही वाहने चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही कार आजपर्यंत सापडलेल्या नसून अज्ञात चोरट्यांविरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांमुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!