हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

तालुक्यात सामाजिक अर्थसहाय्य योजनांअंतर्गत ५४२ लाभार्थ्यांना मंजुरी

शिरपूर (प्रतिनिधी) तालुक्यात सामाजिक अर्थसहाय्य योजनांअंतर्गत मंजुरीबाबत शिरपूर तहसील कार्यालयात तहसीलदार महेंद्र माळी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली.या बैठकीत विविध योजनेतील एकूण ५४२ लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आला आहे.यात संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत (१६२), श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती योजना अंतर्गत (२५७), इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना अंतर्गत (६८), इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना अंतर्गत (२९), तर राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अंतर्गत (२६)/लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे.मंजूर झालेल्या सर्व लाभार्थ्यांनी आपले मंजुरी आदेश संबंधित सेतु केंद्रातून प्राप्त करून घ्यावेत, तसेच अनुदान मंजुरी आदेश, बँक पासबुकची छायांकित प्रत व अद्ययावत आधार कार्डची छायांकित प्रत शिरपूर तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखेत जमा कराव्यात, असे आवाहन करीत लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर केल्यास लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम तात्काळ सुरू करण्यात येईल,असेही तहसीलदार महेंद्र यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!