हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

दहिवद येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू 

क्राइम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर  तालुक्यातील दहिवद गावाजवळ विनायक काशिनाथ पाटील या 35 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी विनायकचा मृत्यू घातपाती असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले.
 विनायक दहिवद येथील रहिवासी होता. तो शिरपूरजवळ टेक्स्टाईल कंपनीत कामाला होता. 19 ऑगस्टला दुपारी तो गावाजवळच्या शेतात गेला होता. तेथून बराच वेळ न परतल्याने त्याचा शोध सुरू झाला. दैवत गावाजवळ असलेल्या मानव केंद्रासमोर मोकळ्या जागेतील चारीत  तो मरून पडलेला आढळला. त्याच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाची जखम दिसून आली. मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. तेथे नातलगांनी गर्दी केली होती. त्याचा मृत्यू संशयास्पद असून संशयिताला तातडीने अटक करावी अशी मागणी त्यांनी केली. दोन दिवसापूर्वी त्याच्याशी गावात एकाने भांडण उतरून काढले होते अशीही माहिती त्यांनी दिली. दरम्यान पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. मृत विनायक पाटील यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. माजी सरपंच तथा शिरपूर साखर कारखान्याच्या कामगार युनियनचे नेते कै.जगन भिला पाटील यांचा तो पुतण्या होय.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!