हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

पीआय जयपाल हिरे यांच्या खुनाचा प्रयत्न, सात जणांना अटक

क्राइम ब्लास्ट ब्यूरो
आक्रोश मोर्चानंतर परत जाताना पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पाठीवर चाकूने वार करून जखमी केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी प्रमुख संशयित जगन सतीश भिल याच्यासह सात जणांना  अटक केली.
१८ ऑगस्टला दुपारी शहरातील गुजराती कॉम्प्लेक्सच्या चौकात ही घटना घडली होती. वाहतूक अडवून धिंगाणा  घालणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी गेलेले पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पाठीत चाकूने वार करण्यात आला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तसेच प्रत्यक्षदर्शिनी काढलेल्या व्हिडिओवरून संशयितांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यात प्रमुख संशयित जगन भिल (वय 19,रा.हाडाखेड), सागर जहागीलाल पावरा (वय 20), अनिल सीताराम पावरा (वय 20, दोघे रा.दहिवद), दिनेश रमेश पावरा (19, रा.बोराडी), राहुल संजय भिल (रा.19), कुणाल सुभाष भिल (वय 19, दोघे रा.सोनगीर) व सुनील लोटन सोनवणे (वय 23, रा.दहिवद) यांना अटक करण्यात आली.
त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.  दरम्यान पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी शिरपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व पुढील कारवाईबाबत सूचना दिल्या.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!