क्राइम ब्लास्ट ब्यूरो
शिक्षकाकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना शिक्षण विस्तार अधिकारी महिलेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.
तक्रारदार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चांदे, ता.जि. धुळे येथे पदवीधर शिक्षक या पदावर कार्यरत असुन त्यांच्याकडे शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा तात्पुरता कार्यभार देण्यात आलेला आहे. दि.०७.०८.२०२५ रोजी श्रीमती रोहिणी नांद्रे, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी तक्रारदार यांच्या शाळेस भेट देवुन सदर दिवशी विदयार्थ्यांची संख्या कमी असल्याने तक्रारदार यांचा वरिष्ठांना प्रतिकुल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात व शाळेस समग्र शिक्षा योजने अंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात स्वतः करीता व शिक्षण अधिकारी श्रीमती कुवर यांचेकरीता १०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याने तकारदार यांनी ला.प्र.वि. धुळे कार्यालयाकडे दि.११.०८.२०२५ रोजी तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची दि.११.०८.२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता आलोसे श्रीमती रोहिणी नांद्रे यांनी स्वतः करीता व शिक्षण अधिकारी श्रीमती कुवर यांचेकरीता १०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केले होते.
त्यानंतर आज दि.१२.०८.२०२५ रोजी सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान श्रीमती रोहिणी दत्तात्रय नांद्रे, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती, धुळे यांनी कार्यालयातील त्यांचे कक्षात सदर लाचेची रक्कम तकारदार यांचेकडुन स्वतः स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात येवुन त्यांचे विरुध्द देवपुर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक श्री माधव रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदिश बडगुजर, सागर शिर्के, प्रितेश चौधरी व रेश्मा परदेशी यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.