क्राईम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर तालुक्यातील करवंद गावात दुकान फोडून चोरी करणाऱ्या संशयित युवकाला शहर पोलिसांनी शिताफीने 24 तासात अटक केली असून त्याच्याकडून 26 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
करवंद गावातील मयूर सोनार यांच्या मालकीचे कृष्णामाई अमृततुल्य चहा दुकान व जनरल स्टोअर्स आठ ते नऊ जुलैच्या दरम्यान फोडून 26 हजार 500 रुपये चोरीस गेले होते. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना चोरीत गावातीलच युवक सहभागी असल्याची माहिती मिळाली.
परदेशी यांच्या आदेशावरून पोलिसांनी संशयित तबरेज शेख नजीम शेख या 24 वर्षीय युवकाला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देऊन चोरीपैकी 26 हजार रुपये काढून दिले. 11 जुलैला त्याला शिरपूर न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, डीवायएसपी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, डीबी पथकाचे हवालदार राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, भटू साळुंखे, मनोज महाजन, मनोज दाभाडे, सचिन वाघ, प्रशांत पवार, आरिफ तडवी, सोमा ठाकरे, उमेश पवार, होमगार्ड मिथुन पवार यांनी ही कामगिरी बजावली.