हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मोठी लाच घेतांना छोटू पाटील सापडला !

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

प्रकल्पग्रस्ताच्या दाखल्यासाठी आवश्यक असलेला चौकशी अहवाल देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्विकारतांना चिमठाणे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात मंडळ अधिकारी छोटू महादू पाटील याला अँटी करप्शन ब्यूरोने 20 जूनला रंगेहाथ पकडले.

या प्रकरणातील तक्रारदाराच्या वडिलांच्या नावाने सोंडले (जि.धुळे) शिवारात शेती आहे. सुलवाडे-जामफळ-कनोशी उपसा सिंचन अंतर्गत जामफळ पाया व बुडीत क्षेत्रासाठी सदर शेती संपादित करण्यात आली. तक्रारदाराला शासकीय नोकरीसाठी प्रकल्पग्रस्ताच्या दाखल्याची गरज होती. त्यामुळे त्याने पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज केला. त्यांनी तो चौकशीकामी शिंदखेड्याच्या तहसीलदारांकडे पाठवला. तहसीलदारांनी चौकशीची जबाबदारी तामथरे येथील मंडळ अधिकारी छोटू पाटील याच्याकडे सोपवली. मात्र सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनदेखील छोटू पाटील यांनी चौकशी केली नाही. याबाबत विचारणा केल्यावर त्याने तीन हजार रुपयांची लाच मागितली.

लाच द्यावयाची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अँटी करप्शन ब्यूरोशी संपर्क साधला. तक्रारीची खातरजमा झाल्यावर तक्रारदाराने पुन्हा पाटील याच्याशी संपर्क साधला असता दोन हजारांत तडजोड झाली. त्यानुसार लाचेची रक्कम स्विकारतांना संशयिताला रंगेहाथ पकडण्यात आले. धुळे येथील अँटी करप्शन ब्यूरोचे उपअधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!