हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

अट्टल चोरट्यांकडून नऊ मोटारसायकल जप्त

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने तालुक्यातील वाडी गावातील दोन संशयितांना अटक करुन त्यांच्याकडून चोरीच्या नऊ मोटारसायकल जप्त केल्या. या मोटारसायकलची एकूण किंमत तीन लाख 60 हजार रुपये आहे.

शहरातील 80 फुटी रस्त्यावरुन 8 मेस रात्री राधेश्याम पाटील याची मोटारसायकल (एमएच 19,इ इडी 8410) चोरीस गेली होती. या गुन्ह्याचा तपास करतांना सहा जूनला पेट्रोलिंग पथकाला बजाज पल्सर दुचाकीवर दोन तरूण फिरतांना आढळले. त्याची चौकशी केल्यावर संशयितांनी दिशाभूल करणारी उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीअंती संशयितांची नावे दिनेश आपसिंह पावरा (वय 22) व विशाल सचिन भिल (वय22, दोघे रा.वाडी) असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी चोरीची कबुली देऊन वाडी गावाजवळ कोरड्या नाल्यात लपवून ठेवलेल्या मुद्देमालाची माहिती दिली. तेथून एकूण नऊ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. त्यांची किंमत तीन लाख 60 हजार रुपये आहे. संशयितांना न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी दिली. हवालदार रवींद्र आखडमल तपास करीत आहेत.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोरकुमार परदेशी, शोध पथकाचे हवालदार राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, सोमा ठाकरे, आरिफ तडवी, विलास कोळी, सचिन वाघ, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, भटू साळुंखे, प्रशांत पवार, मनोज महाजन, मनोज दाभाडे, दादाभाई बोरसे, रवींद्र महाले यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!