हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

बोराडीला मुलाने केली बापाची हत्या

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

वडिलांनी घरातून निघून जावे अशा कारणावरुन त्यांच्याशी भांडण करुन बेदम मारहाण करुन खून केल्याच्या गुन्ह्यात सांगवी पोलिसांनी संशयित मुलास अटक केली. खुनाची घटना एक जूनला रात्री साडेअकराला तालुक्यातील बोराडी गावात घडली.

सिंगा तुमडू पावरा (वय 70) असे मृताचे नाव असून त्यांचा मुलगा सुनिल पावरा (वय 30) याने त्यांचा खून केल्याचा संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापलेकांनी एकत्र घर बांधले होते. परंतु दोन दिवसांपासून वडिलांनी घर सोडून जावे अशी मागणी करुन सुनिल त्यांच्याशी भांडत होता. त्यात एक जूनला रात्री तो घरात आल्यावर वडील झोपल्याचे पाहून त्याचा संताप अनावर झाला. त्याने सिंगा पावरा यांना शिवीगाळ केली आणि लाकडी दांड्याने त्यांच्या डोक्यात मारले. त्यात गंभीर जखमी झालेल्या सिंगा पावरा यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालय व तेथून धुळे येथे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले. तेथे त्यांचे निधन झाले.

सिंगा पावरा यांचा मोठा मुलगा अमावश्या पावरा याने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित सुनिल पावरा याच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित सुनिल पावरा याला शिताफीने अटक केली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी सुनिल गोसावी यांनी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक मिलिंद पवार, हवालदार संदीप ठाकरे, रमेश माळी, भूषण चौधरी, संजय चव्हाण, मोहन पाटील, रणजीत वळवी, अलताफ मिर्झा यांचे कौतुक केले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!