हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मर्चंट बँक घोटाळ्यातील बडे मासे जाळ्याबाहेरच !

संदीप जमादार
क्राइम ब्लास्ट ब्यूरो

तालुक्यातील पहिली सहकारी बँक अशी प्रतिष्ठा लाभलेल्या शिरपूर मर्चंट बँकेला डबघाईला आणणारा मास्टर माईंड प्रसन्न जैन व त्याच्या भावांवर गुन्हा दाखल झाला. मात्र या पापात बरोबरीचे हिस्सेदार असलेल्या इतर बड्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचे एफआयआरवरुन स्पष्ट झाले आहे. तब्बल 14 जणांची नावे खूप मोठ्या डील करुन वगळल्याचे आरोप सभासदांमधून केले जात आहेत.

पावणेचौदा कोटी रुपयांची असुरक्षित कर्जे घेऊन ती न भरता बँकेची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन 48 जणांविरोधात शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राठी नामक सीएने हा गुन्हा दाखल केला. मात्र आरोपींमधून 14 जणांना बुद्धिपुरस्सर वगळल्याचा सूर आळवला जात आहे.

ज्या व्यक्तिंच्या नावांचा एफआयआरमध्ये समावेश आहे, त्यापैकी काही जणांनी यापूर्वीच कर्ज नील करुन खाते बेबाक केले आहे. तरीही त्यांची नावे फिर्यादीत समाविष्ट आहेत. कदाचित हा तांत्रिक भाग असू शकेल. पण कोणतेही तारण, पूरक कागदपत्रे, जामीन आदि काहीही न जोडता समोर आलेल्या कर्ज प्रकरणांना मान्यता देणार्‍या प्रसन्न जैन यांच्या संचालक मंडळावर गुन्हे का दाखल केले नाहीत ही खूप मोठी संशयास्पद बाब आहे. त्यांची नावे टाळण्याच्या मोबदल्यात काय व्यवहार झाला, याचेही वेगवेगळे आकडे समोर येत आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास डीवायएसपींकडे असला तरी लवकरच हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची दाट शक्यता आहे. मात्र या गुन्ह्याची एकूण व्याप्ती लक्षात घेता त्याचा काळजीपूर्वक तपास व्हावा, कोणाचाही व्यर्थ बळी जाऊ नये किंवा कोणा आरोपीची गय केली जाऊ नये अशी अपेक्षा सभासदांमधून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!