हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

दीड लाखांचे बनावट बियाणे जप्त !

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर जय भद्रा भूई काट्यावर एका संशयिताकडून एक लाख 33 हजार 650 रुपये किमतीचे बनावट कापसाचे बियाणे जप्त करण्यात आले.

20 मे रोजी दुपारी दोन वाजता ही कारवाई करण्यात आली. सांगवी पोलीस व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण श्रीराम तायडे यांनी कारवाई केली.

तायडे यांना संशयित बोगस बियाणे विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी त्याच्याशी संपर्क करून खरेदीदार असल्याचे भासवून बियाणे विक्रीसाठी बोलावून घेतले. महामार्गावर जय भद्रा भुईकाटा येथे संशयित बियाण्यांच्या साठ्यासह पोहचला. त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकून संशयित सूर्यकांत बन्सीलाल गुजर उर्फ पंकज पटेल (रा.भरवाडे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक लाख 33 हजार 650 रुपये किमतीची कपाशीच्या बियाण्याची 81 पाकिटे आढळली. त्यावर उत्पादन क्रमांक, प्रमाणीकरण व अन्य काहीही मजकूर नव्हता. त्यामुळे सदर बियाणे बनावट असून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने संशयित बाळगून असल्याचे निष्पन्न झाले. अरुण तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पंकज पटेल, भरतकुमार दुलाभाई पटेल (रा.अहमदाबाद, गुजरात), बियाण्यांचे उत्पादक कंपनी व सदर कंपनीचे प्रतिनिधी अशा एकूण सहा जणांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पेरणीपूर्व हंगामातच बनावट बियाणे विक्रीचा प्रयत्न उघडकीस आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!