क्राईम ब्लास्ट ब्यूरो

जिल्ह्यातील सुप्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्त्या तथा धुळे जिल्हा जागृत जनमंच संघटनेच्या संस्थापक डॉ. सरोज पाटील यांना चार संशयितांनीं मारहाण केल्याची धक्कादायक घटना 29 ऑक्टोबरला दुपारी घडली.
संशयितांमध्ये एका महिलेचा समावेश असून तिने सरोज पाटील यांना ओढणीने गळफास लावण्याचाही प्रयत्न केला. शिरपूर तालुक्यातील बाभूळदे शिवारात शेतात ही घटना घडली. डॉ.सरोज पाटील यांचे हे शेत आहे. मात्र त्यावर ताबा बसवण्याच्या वादातून 29 ऑक्टोबरला दुपारी अडीचला संशयित देवा काठेवाडी, भुरा काठेवाडी, पुना भिल, छायाबाई दाजभाऊ भिल (सर्व रा. बाभुळदे) यांनी मारहाण केली. छायाबाई भिल हिने लाकडी काठीने त्यांच्या पाठीवर व हातावर मारून दुखापत केली तसेच गळ्यात ओढणी टाकून गळफास लावण्याचा प्रयत्न केला. याबाबत डॉ.सरोज पाटील यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संशययितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक टाकणे तपास करीत आहेत.