हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

65 लाखांच्या गुटख्यासह एकाला अटक

पहा व्हिडीओ

क्राईम ब्लास्ट ब्यूरो


शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील आरटीओ चेक पोस्टवर गुटख्याने भरलेला कंटेनर सांगवी पोलिसांनी दोन ऑक्टोबरच्या मध्यरात्री जप्त केला. या कारवाईत दीडशे पोत्यात भरलेला फाइव्ह एचके ब्रँडचा गुटखा व कंटेनर मिळून एकूण 89 लाख 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून चालकाला अटक करण्यात आली.


जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगवी पोलिस ठाण्यात या कारवाईची माहिती दिली. सांगवीचे एपीआय जयेश खलाणे यांना गुट महामार्गावर कंटेनरमधून सुगंधित पानमसाल्याची तस्करी सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी सहकार्‍यांसोबत हाडाखेड येथील आरटीओ चेक पोस्टवर सापळा रचला. संशयित कंटेनर (आरजे 11, जीसी 2809) चेक पोस्टवर आल्यानंतर पोलिसांनी तो थांबवला. त्याच्यामधील मालाबाबत चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी संशयावरुन कंटेनरची झडती घेतली. त्यात गुटख्याचा साठा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कंटेनर पोलिस ठाण्यात नेऊन तेथे तपासणी करण्यात आली. त्यात एकूण दीडशे पोती गुटख्याने भरल्याचे आढळले.

गुटख्याची एकूण किंमत 64 लाख 35 हजार रुपये आहे. कंटेनरसह एकूण 89 लाख 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून चालक अजितसिंह अमरसिंह (वय 35, रा.नागलादाली ता.सदाबाद जि.महामायानगर, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात अन्न व औषध निरीक्षक किशोर बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

सांगवी पोलिस ठाण्यात जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी गुटख्याच्या साठ्याची पाहणी केली. या कारवाईत सहभागी पोलिस पथकाला दहा हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्याचे त्यांनी जाहीर केले. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संदीप पाटील, हवालदार संजय माळी, पोलिस नाईक संदीप ठाकरे, हवालदार अलताफ मिर्झा यांनी ही कारवाई केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!