हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

माजी सरपंच महिलेची आत्महत्या

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

शहरातील सदाशिव नगर येथील महिलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सहा सप्टेंबरला सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान घडली.

रेखाबाई विजय वाडिले (वय 40) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या थाळनेर गावाच्या माजी सरपंच होत्या. मुलांच्या शिक्षणासाठी त्या काही काळापासून शिरपूर शहरात सदाशिव नगरमध्ये राहत होत्या. सकाळी घरात कोणीही नसतांना त्यांनी गळफास लावून घेतला.

ही घटना लक्षात येताच त्यांना खाली उतरवून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय तपासणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचे वृत्त कळताच समाज बांधवांसह पदाधिकार्‍यांची मोठी गर्दी रुग्णालयात जमली. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!