हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूरच्या तरूणीचा हात कापला

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील ट्रकने बसला धडक देऊन झालेल्या अपघातात शिरपूरच्या रहिवासी तरूणीचा हात कापला गेला. तिला उपचारासाठी इंदोर येथे रवाना करण्यात आले. या अपघातात एक प्रवासी ठार झाला असून 15 जण गंभीर जखमी आहेत.

मध्यप्रदेशातील इंदोरहून नाशिक येथे जाण्यासाठी निघालेल्या प्रवासी बसला एक सप्टेंबरला बिजासन घाटात मागाहून येणार्‍या ट्रकने जोराची धडक दिली. त्यामुळे नियंत्रण सुटून बस रस्त्यावर उलटली. या अपघातात शिरपूरच्या मानसी अभय (वय 19) या तरूणीचा हात कापला गेला असून तिला इंदोर येथे रवाना करण्यात आले. अपघातात वाहक वास्कले जागीच ठार झाले.

अपघातानंतर ट्रक डिव्हायडरला धडकला. त्यामुळे ट्रकची केबिन चेपली जाऊन चालक अडकला. बराच वेळ प्रयत्न करुन त्याला बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिका, पोलिसांची वाहने व खाजगी वाहनांचा वापर करुन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने दूर करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!