हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

पिकअप उलटून 21 महिला मजूर जखमी

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

मजुरांना शेतात घेऊन जाणारी पिकअप उलटून झालेल्या अपघातात 22 मजूर जखमी झाले. जखमींमध्ये 21 महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. त्यातील 14 जणांना प्राथमिक उपचारानंतर धुळे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.

शिरपूर तालुक्यातील थाळनेर ते भोरखेडा रस्त्यावर 14 ऑगस्टला सकाळी आठला हा अपघात घडला. मजुरांना शेतात घेऊन जाणारी पिकअप (एमएच 18, बीझेड 0167) चालकाचे नियंत्रण सुटून उलटली.

अपघातात दबले जाऊन मजुरांनी किंकाळ्या फोडल्या. त्या ऐकून परिसरातील शेतकरी व ये-जा करणारे वाहनचालक थांबले. त्यांनी जखमींना तातडीने थाळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये सुनंदाबाई भरत मराठे, विमलबाई बळीराम मराठे, प्रियंका सुकलाल कोळी, प्रमिलाबाई भिका मराठे, अलकाबाई महेश सावळे, अनिताबाई अरविंद सावळे, छायाबाई बापू वाडीले, संगीता गुलाब कोळी, सरलाबाई सुभाष मराठे, वर्षा भगवान कोळी, राजेंद्र शांताराम शिरसाट, सपना किरण शिरसाट, नंदिनी सुकलाल कोळी, चंदनबाई पुंडलिक कोळी, वंदना दीपक शिरसाट, लताबाई देवराम पानसरे, निंबाबाई बन्सीलाल कोळी, कविताबाई गुलाब कोळी, ज्योती छोटू बडगुजर, चंद्रभागाबाई आधार मराठे, प्रतिभा प्रवीण सावळे, सुनिता सुकलाल कोळी (सर्व रा.थाळनेर) यांचा समावेश आहे.

थाळनेर येथे प्रथमोपचार केल्यानंतर आवश्यकतेनुसार 14 महिलांना धुळे येथे रवाना करण्यात आले. पाऊस पडल्याने रस्ता निसरडा झाला होता. त्यावर ब्रेक न लागल्याने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी कळते. अपघाताची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. दरम्यान थाळनेर येथील लोकप्रतिनिधींनी रुग्णालयात भेट देऊन महिलांची विचारपूस केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!