क्राइम ब्लास्ट ब्यूरो
जन्माची नोंद करुन जन्मतारखेचा दाखला देण्यासाठी लाच घेतांना शिरपूर तालुक्यातील जामन्यापाडा येथील ग्रामसेवकाला पाच जूनला रंगेहाथ पकडण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला एका व्यक्तीच्या जन्माची नोंद करुन जन्मदाखला हवा होता. या कामासाठी जामन्यापाडा येथील ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी याने लाचेची मागणी केली. लाच द्यावयाची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक शाखेशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यावरुन सापळा रचून संशयित ग्रामसेवक चौधरी याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.