हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

आत्महत्येचे स्टेटस ठेवून युवकाची तापी नदीत उडी…

सावकारांच्या त्रासामुळे घेतला टोकाचा निर्णय

 

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

माझ्या आईवर आणि भावावर कर्ज झाले आहे..कर्ज देणारे खूप त्रास देत आहेत. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे…

दुपारी अडीचला असे व्हॉटस अ‍ॅप स्टेटस ठेवून शिरपूर शहरातील क्रांतीनगर येथील बंटी धनगर या युवकाने तापी नदीत उडी टाकली. सावकारांच्या जाचामुळे कंटाळून त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येत असून अवैध सावकारी आणखी किती जणांचे बळी घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बंटी धनगर याने तापी नदीत उडी घेतांना काहींनी प्रत्यक्ष पाहिले. त्यापूर्वी दुपारी अडीचला त्याने सावकारांच्या त्रासामुळे जीव देत असल्याचे व्हॉटसअ‍ॅप स्टेटस ठेवले होते. काहींनी त्याला फोन करुन आत्महत्येच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही केल्याचे कळते. मात्र सर्वांना झुगारुन देत त्याने आपला निर्णय खरा ठरवला.

प्राप्त माहितीनुसार, बंटी धनगर याच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई, दोन भाऊ व एक बहीण अशा परिवारातील बंटीच्या मोठ्या भावाने काही जणांकडून कर्ज घेतले होते. प्रचंड व्याजदर लावल्यामुळे कर्जाची रक्कम वाढत गेली. संशयित सावकार भावाला मारहाण करुन वसुली करु लागले. त्यामुळे भावाने काही दिवसांपूर्वी शिरपूर सोडले. नंतर सावकारांनी आपला मोर्चा बंटीकडे वळवला. त्यालाही धमकावणे सुरु झाले. त्यांच्या त्रासाला वैतागून बंटी धनगर याने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!