क्राइम ब्लास्ट ब्यूरो
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी करणारा आयशर ट्रक 27 मेच्या मध्यरात्री शिरपूर पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत सुमारे 40 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए.एस.आगरकर यांना मध्यप्रदेशातून शिरपूरमार्गे गुटख्याची तस्करी सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी आदेश दिल्याने पोलिस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांनी सहकार्यांसोबत कळमसरे शिवारातील शहादा फाट्यावर वाहनांची तपासणी सुरु केली. रात्री सव्वादोनला संशयित आयशर ट्रक (यूपी 53, इटी 0241) शिरपूरच्या दिशेने येतांना दिसताच पोलिसांनी तो अडवला. घटनास्थळी ट्रकची तपासणी केल्यावर प्लास्टिक फिल्मच्या आडोशाला 19 लाख 74 हजार रुपये किंमतीची भोला छाप सुगंधीत तंबाकू (गुटखा) आढळला. गुटख्याची एकूण 50 खोकी जप्त करण्यात आली. संशयित चालक जमाल अली अहमद (रा.उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. ट्रकसह एकूण 39 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए.एस.आगरकर, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, डी.बी.पथकाचे हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, मनोज पाटील, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, स्वप्निल बांगर, अमित रणमळे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, सचिन वाघ, भटू साळुंके, प्रविण गोसावी तसेच होमगार्ड मिथून पवार, राम भिल, चेतन भावसार व शरद पारधी यांनी ही कारवाई केली.