हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मुंबईचे गांजा स्मगलर जेरबंद

क्राइम ब्लास्ट ब्यूरो
स्विफ्ट डिझायर कारमधून मुंबईला गांजा घेऊन जाण्याचा बेत सांगवी पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे उधळला गेला. सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी सहकार्‍यांच्या मदतीने गांजाची तस्करी करणार्‍या दोघांच्या मुसक्या आवळल्या. मुंबईच्या मुलूंड भागातील रहिवासी असलेल्या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 20 किलो गांजा आणि कार असा सहा लाख 97 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गांजाच्या वाहतुकीबाबत सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना माहिती मिळाली होती. त्यांनी सहकार्‍यांसह हाडाखेड येथील सीमा तपासणी नाक्यावर नाकाबंदी केली. मध्यप्रदेशाकडून शिरपूरच्या दिशेने भरधाव जाणार्‍या मारुती स्विफ्ट डिझायर (एमएच 03, सीपी 5863) ला संशयावरुन पोलिसांनी थांबवले. वाहनाची झडती घेतली असता चालकाच्या मागील सीटवर पांढर्‍या पोत्यात गुंडाळलेला गांजा आढळला. त्याचे वजन 19 किलो 700 ग्रॅम भरले.गांजा व कारची एकूण किंमत सहा लाख 97 हजार रुपये आहे.

संशयितांमध्ये स्विफ्टचालक रज्जाक मेगदाद शेख (वय 54, रा.सिंधी कॉलनी, मुलूंड कॉलनी, मुंंबई) व विनोद रमेश शर्मा (वय 33, रा.मुलूंड पश्चिम, मुंबई) यांचा समावेश आहे. संशयित गांजा कोठून व कोणासाठी घेऊन चालले होते याचा तपास पोलिस करीत आहेत. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुरेश शिरसाठ, उपनिरीक्षक सुनील वसावे, हवालदार संजय सूर्यवंशी, पवन गवळी, मंगेश मोरे, जाकिर शेख, संदीप शिंदे, सागर ठाकूर, मनोज नेरकर, शिवाजी वसावे, जयेश मोरे, भगवान गायकवाड, कृष्णा पावरा, संतोष पाटील, मनोज पाटील, इसरार फारूकी यांनी ही कारवाई केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!