हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मार्केट संचालकाकडून 30 लाखांची लाच घेतांना जिल्हा उपनिबंधक ताब्यात

वकीलही सापडला

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नुकत्याच निवडून आलेल्या संचालकांच्या बाजूने निकाल देण्यासाठी 30 लाख रुपयांची लाच स्विकारताना नाशिक येथील सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (वय 57) व खाजगी वकील शैलेश सुमतीलाल साबद्रा (वयब32) यांना नाशिक येथील अँटी करप्शन ब्युरो पथकाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदार 40 वर्षीय पुरुष नाशिक जिल्ह्यातील एका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नुकतेच निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीला विरोध करणारी तक्रार जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे दाखल करण्यात आली होती. त्या दाव्यात तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर 30 लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी सतीश खरे व शैलेश साबद्रा यांनी केली. त्याबाबत संचालकांनी नाशिक येथील अँटी करप्शन ब्यूरोशी संपर्क साधून तक्रार दिली. लाच देण्यासाठी खरे याने संचालकांना त्याच्या कॉलेज रोड येथील राहत्या घरी बोलावले. तेथे वकील साबद्राही हजर होता. त्यांनी रक्कम स्वीकारताच अँटी करप्शनच्या पथकाने छापा टाकून दोघांना रंगेहाथ पकडले.

अँटी करप्शन ब्युरोच्या अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक अभिषेक पाटील,  सहायक उपनिरीक्षक  सुकदेव मुरकुटे, पोलिस नाईक मनोज पाटील, अजय गरुड यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!