हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

लालमातीजवळ एकाचा खून

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर तालुक्यातील सांगवी गावाजवळ लालमाती येथे आठ मे रोजी सकाळी साडेसातला झुडुपात फेकलेलाअनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार असल्याचे दिसत असून पोस्टमार्टेम केल्यानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृताचे वय सुमारे 35 ते 45 वर्षाच्या दरम्यान आहे. त्याच्या गळ्यावर आवळल्याची खूण व मांडीजवळ भाजल्याचे दिसून आल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मृतदेहाच्या अंगावर शर्ट आणि अंडरपॅन्ट आहे.सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट व सहकाऱ्यांनी मध्यप्रदेशातील सेंधवा शहरापर्यंत जाऊन त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र मृत कोण व कुठला आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. त्याचा अन्यत्र खून करून मृतदेह सांगवीजवळ आणून टाकला असावा असा संशय आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. घटनास्थळी डीवायएसपी ए.एस.आगरकर यांनी भेट दिली. फोरेन्सिक टीम व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!