येथे वाचा संपूर्ण निकाल
क्राइम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकवार आमदार अमरीशभाई पटेल यांचे वर्चस्व सिद्ध झाले असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या शेतकरी विकास पॅनलने सर्व 18 जागा पटकावल्या.

शिरपूर बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक झाली. 30 एप्रिलला सकाळी आठपासून पांबामा म्युनिसिपल हायस्कूलमधील आठ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. दुपारी चारला मतदान संपले. एकूण 93 टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

शिरपूर बाजार समितीच्या राष्ट्रीय किसान विकास योजनेच्या गोडाऊनमध्ये सायंकाळी पाचपासून मतमोजणीला सुरवात झाली. तहसीलदार महेंद्र माळी, मुख्य निवडणूक अधिकारी मनोज चौधरी, निवडणूक अधिकारी व्ही.बी.पापुलवाड, सहायक अधिकारी बी.एम.दुसाने, संजय ऐंडाइत, एस.एस.साळी, अमोल ऐंडाइत यांच्या उपस्थितीत मतमोजणी करण्यात आली.
गटनिहाय उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी,
सोसायटी मतदारसंघ : सर्वसाधारण (सात जागा) :
1.बाळासाहेब पाटील (शिटी) : 203
2.किरण गुजराथी (कपबशी, विजयी) : 672
3.शांतीलाल जमादार (कपबशी, विजयी) : 657
4.अरविंददास पाटील (कपबशी, विजयी) : 662
5.कांतीलाल पाटील (कपबशी, विजयी) : 624
6.चंदू पाटील (कपबशी, विजयी) : 653
7.मनोहर पाटील (शिटी) : 210
8.मिलिंद पाटील (शिटी) : 241
9.मोहन पाटील (शिटी) : 260
10.शरद पाटील (शिटी) : 213
11.शिवाजी पाटील (कपबशी, विजयी) : 601
12.संतोष पाटील (शिटी) : 224
13.विठोबा महाजन (कपबशी, विजयी) : 559
14. गोपालसिंह राजपूत (शिटी) : 265
सोसायटी महिला मतदारसंघ (दोन जागा) :
1.मेघा पाटील (कपबशी, विजयी) : 689
2.मनीषा मराठे (कपबशी, विजयी) : 691
3.उज्ज्वला महाजन (शिटी) : 256
4.संगीताबाई राजपूत (शिटी) : 260
सोसायटी इतर मागास प्रवर्ग (एक जागा)
1.प्रसाद पाटील (कपबशी, विजयी) : 762
2.मनोहर भदाणे (शिटी) : 233
सोसायटी अनुसूचित जमाती (एक जागा)
1.कृष्णा पावरा (कपबशी, विजयी) : 730
2.मोहन पावरा (शिटी) : 257
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ (दोन जागा)
1.हिरालाल परदेशी (शिटी) : 246
2.लक्ष्मीकांत पाटील (कपबशी, विजयी) : 793
3.आनंदसिंह राऊळ (कपबशी, विजयी) : 719
ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती (एक जागा)
1.जगन पावरा (कपबशी, विजयी) : 769
2.विलास पावरा (शिटी) : 261
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक (एक जागा)
1.मिलिंद बोरसे (कपबशी, विजयी) : 777
2.हेमराज राजपूत (शिटी) : 256
व्यापारी मतदारसंघ (दोन जागा)
1.अर्पित अग्रवाल (पंखा, विजयी) : 76
2.संतोष चौधरी (टेलिफोन) : 55
3.सतीश जैन (टोपी, विजयी) : 72
4.मोहन पाटील (छत्री) : 49
5.सतीश मोरे (शिटी) : 10
हमाल-मापाडी मतदारसंघ (एक जागा)
1.किरण कढरे (ऑटोरिक्षा, विजयी) : 162
2.डॅनी चांदे (विमान) : 110
3.प्रकाश रुखमे (पणती) : 23