हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

दारुच्या उधारीवरुन झाला युवकाचा मर्डर

राजू कोळीच्या खुनाचा दारु विकणार्‍यांवर गुन्हा

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

वाल्मिकनगर येथील युवकाला दारूच्या उधारीवरुन मारहाण करुन त्याचा खून केल्याच्या संशयावरुन चार जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

योगेश कोळी, बंटी कोळी, दीपक कोळी व छोटू कोळी अशी संशयितांची नावे असून ते किस्मतनगर परिसरातील रहिवासी आहेत.

संशयितांनी केलेल्या मारहाणीत मरण पावलेला राजू सुदाम कोळी याचा भाऊ राकेश कोळी याने शहर पोलिसांत फिर्याद दिली. राजूला दारुचे व्यसन असून तो किस्मतनगर येथे दारु प्यायला जात होता. दारूच्या उधारीचे पैसे थकल्याने संशयितांनी यापूर्वीही त्याला मारहाण केली होती. 23 एप्रिलला पुन्हा संशयितांनी त्याला बेदम मारहाण केली. त्याच्या कानातून रक्त आल्यानंतर तो घरी येऊन झोपला. रात्री त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!