हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपुरात युवकाचा संशयास्पद मृत्यू

अंगावर मारहाणीच्या खुणा, रक्ताचे डाग

संदीप जमादार

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर शहरातील वाल्मीक नगर भागात राहत्या घरात युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना 23 एप्रिलला दुपारी घडली.

राजू सुदाम कोळी (वय 32) असे मृताचे नाव आहे. तो चार भाऊ आणि आईसह राहतो. 23 एप्रिलच्या दुपारी लहान भाऊ गणेश त्याला उठवण्यासाठी गेला. मात्र राजू उठला नाही. गणेशने परिसरातील लोकांना माहिती दिली. त्यांनी येऊन खात्री केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

घटना घडली त्यापूर्वी राजुचे भाऊ पानसेमल येथे गेले होते. गणेशने माहिती दिल्यावर सर्वजण तातडीने घरी परतले. त्यांनी राजुचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.

पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचा पंचनामा केला. राजुच्या मानेवर, कानावर व पाठीवर मारहाणीच्या खुणा आढळल्या. रक्ताचे डागही दिसून आले. त्यामुळे त्याचा मृत्यू घातपाती असल्याची शक्यता वर्तवण्यात आली.

त्याच्या भावांनी दिलेल्या माहितीनुसार, काहीजण तीन चार दिवसांपासून त्यांच्या घरी येऊन राजुला धमकावत होते. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!