शिरपूर ब्रेकिंग…..चाऱ्यातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर तालुक्यातील बोराडी-मालकातर रस्त्यावर दारू आणि बियरची तस्करी करणारे वाहन अडवून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क), सुनिल चव्हाण (संचालक), अर्जुन ओहोळ (विभागीय उपायुक्त), मनोज शेवरे (अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. निरीक्षक एस.एस. हांडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.
18 एप्रिलच्या पहाटे चार वाजता बोराडी मालकातर रस्त्यावर बोराडी गावात सापळा रचून MH18 BG 5819 या वाहनाला थांबण्याचा इशारा केला. परंतु वाहनचालक वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. वाहनाची तपासणी केली असता सुक्या चाऱ्याच्या गोण्या दिसून आल्या . गोण्या बाजूला करून झडती घेतली असता वाहनामध्ये माउंट बिअरचे 1440 टिन, रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या 1920 क्वार्टर्स बाटल्या आढळल्या. वाहनसह एकूण 9 लाख 41 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फरारी चालक व वाहनांच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. .एस.एस.हांडे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. शिरपूर विभाग शिरपूर , सागर चव्हाण, गणेश जाधव, दुय्यम निरीक्षक, एस.एस.गोवेकर स.दु.नि व जवान सर्व शांतीलाल देवरे गोरख पाटील केतन जाधव, प्रशांत बोरसे, हेमंत पाटील ,मनोज धुळेकर के.एम.गोसावी ,दारासिंग पावारा ,तसेच वाहन चालक .रवींद्र देसले,निलेश मोरे यांनी ही कारवाई केली.