हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

गुंगीचे औषध देऊन मुलीवर बलात्कार

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

पेढा खाऊ घालून त्यातून गुंगीचे औषध देऊन पळवून नेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या संशयावरुन युवक व त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडीत मुलगी अल्पवयीन आहे. 11 एप्रिलला ती घरी स्वयंपाक करीत असतांना संशयित दादू गुलाब कारंडे (वय 22) तेथे पोहचला. त्याने मुलीस खाण्यासाठी पेढा दिला. तो खाल्ल्यानंतर तिला चक्कर येऊ लागले. ती जागीच बेशुद्ध झाली.

काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर रात्रीचे चार वाजले असून ती एका वाहनात असल्याचे आढळले. संशयित दादू कारंडे तिच्यासोबत होता. आपण कुठे जात आहोत अशी विचारणा केल्यानंतर त्याने वाहनातच तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्याचे दोन साथीदारही सोबत होते. काही अंतरावर दादू व मुलीस उतरवून वाहनासह दोघे निघून गेले. तेथील शेडमध्येही दादूने तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. सकाळी त्याचा काका आल्यानंतर त्याने मुलीची सुटका केली. संशयित दादू कारंडे (धमनार ता.साक्री) येथील रहिवासी आहे. संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!