हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

दारूचे बिल न दिल्याने चाकू खुपसला

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

दारू पार्टी केल्यानंतर बिल भरण्यास नकार दिल्याने युवकाच्या पाठीत चाकूने भोसकल्याच्या संशयावरून एकाविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही घटना 15 एप्रिलला सायंकाळी पावणेआठला मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर गरताड शिवारातील सनी गार्डन हॉटेलजवळ घडली. जखमी युवकावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

घटनाक्रमानुसार, सागर सुरेश कोळी (वय 23, रा.खर्दे) व विकास भोई (रा.खालचे गाव बालाजी मंदिराजवळ, शिरपूर) हे सनी गार्डन हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेले होते. पार्टी संपल्यानंतर विकास भोई याने सागरला दारूचे बिल देऊन टाक असे सांगितले. सागरने पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने हॉटेलबाहेर पडल्यानंतर विकासने सागरच्या पाठीत चाकू खुपसला. त्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. सागरने दिलेल्या फिर्यादीवरून थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार संजय धनगर तपास करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!