शिरपूर फाट्यावर गॅरेजमधून काढल्या तलवारी
क्राइम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर फाट्यावर मोटारसायकलवर आलेल्या दोन युवकांना ताब्यात घेऊन शहर पोलिसांनी एकूण 11 तलवारी जप्त केल्या. दोघांना अटक करण्यात आली असून शहर पोलिसांत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना शिरपूर फाटा येथे दोन संशयित तलवार घेऊन येणार असल्याची गोपनीय खबर मिळाली होती. त्यांनी पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाचे हवालदार ललीत पाटील यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांनी शिरपूर फाटा येथे सापळा लावूने मोटारसायकलवर आलेले रोहित राजेंद्र गिरासे (वय 24) व मनीष ओंकार गिरासे (वय 19, दोन्ही रा.अहिल्यापूर) यांना अटक केली. त्यांची झडती घेतली असता मोटारसायकलच्या उजव्या बाजूस सीटलगत प्लास्टीक कागदात एक तलवार दोरीने बांधलेली आढळली.
त्यांनी दिलेल्या माहितीवरुन, बालाजी ऑटो पार्ट नावाने असलेल्या गॅरेजमध्ये निकामी स्पेअर स्पार्ट्सचे आडोशास पांढर्या रंगाच्या प्लास्टीक गोणीत ठेवलेल्या एकूण 10 तलवारी जप्त करण्यात आल्या.
पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए.एस.आगरकर,उपनिरीक्षक गणेश कुटे, संदीप मुरकुटे, डी.बी. पथकाचे हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, मनोज पाटील, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, सचिन वाघ, प्रविण गोसावी, स्वप्निल बांगर, अमित रणमळे, भटू साळुंके, होमगार्ड मिथून पवार, चेतन भावसार, शरद पारधी व राम भिल यांनी ही कामगिरी बजावली.