हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेतून 20 कोटी मंजूर

खा.डॉ.हीनाताई गावित, प्रवीण शिरसाठ यांचा पाठपुरावा

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.हीनाताई गावित यांच्या पाठपुराव्यामुळे पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेतून धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी एकूण 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते व खा.डॉ.गावित समर्थक प्रविण शिरसाठ यांनी या निधीसाठी खासदारांकडे मागणी केली होती.
मंजूर निधीमधून धुळे जिल्ह्याचा वाटा 12 कोटी रुपयांचा असून उर्वरित आठ कोटी रुपये नंदुरबार जिल्ह्यासाठी आहेत. दोन्ही जिल्ह्यातील एकूण 200 जणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अशी माहिती प्रवीण शिरसाठ यांनी दिली.
मत्स्यपालन व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, त्यांचे जीवनमान विकसित व्हावे याहेतूने पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना राबवण्यात येते. 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेला भारताची नील क्रांती असे म्हणून ओळखले जाते. या योजनेंतर्गत तालुकास्तरावर 25 युनिट बायोफ्लॉक बसवून तीन लघु रिसर्क्युलेटरी यंत्रणा कार्यान्वित केल्या जातात. त्यामुळे मत्स्यपालन करणार्‍यांचे उत्पन्न दुपटीने वाढते.
मत्स्यसंपदा योजनेच्या लाभाबाबत प्रवीण शिरसाठ यांनी प्रचार प्रसार केल्यानंतर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मत्स्योत्पादकांनी त्यांच्याकडे योजनेचा लाभ मिळवून देण्याची विनंती केली. त्यामुळे शिरसाट यांनी खा.डॉ.हीनाताई गावित यांच्याकडे पाठपुरावा केला. खा.डॉ.गावित यांनी केंद्रीय मत्स्योत्पादन विभागाकडे सातत्याने निधीविषयक मागणी लावून धरली. त्यामुळे धुळे-नंदुरबार जिल्ह्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. प्रवीण शिरसाठ यांच्यासह परिसरातील मत्स्योत्पादकांनी डॉ.हीनाताई गावित यांचे आभार मानले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!