क्राईम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर तालुक्यातील निमझरी गावात 16 वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
निखिल कैलास पाटील (गुजर) असे मृत मुलाचे नाव आहे. 13 एप्रिलला दुपारी एक वाजता निमझरी गावातील राहत्या घरात त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळला.
ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांची गर्दी जमली. नातलगांनी त्याचा मृतदेह खाली उतरवला. काका मधुकर रतन पाटील यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.
वैद्यकीय अधिकारी डॉ.दिव्या तंवर यांनी तपासून निखिल पाटील याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
निखिलच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार बी.एम.दुसाने तपास करीत आहेत.
