हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूरच्या दोघांना पिस्तुलासह अटक

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

गावठी पिस्तूल आणि काडतूस सोबत घेऊन फिरतांना दोन युवकांना शहर पोलिसांनी अटक केली. दोघेही शिरपूर शहरातील अंबिकानगर येथील रहिवासी आहेत.

शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए.एस.आगरकर यांना अवैध पिस्तुलाबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी दहा एप्रिलच्या रात्री साडेअकराला सापळा रचून शिरपूर टोलनाक्याजवळ हॉटेल गॅलक्सीसमोर मोटारसायकलवरील दोन युवकांना संशयावरुन ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत देशी पिस्तूल, दोन काडतूसे आढळली.

अरबाज इस्माइल शेख (वय 21) व शाबीर शहा सगीर शहा (वय 19) अशी संशयितांची नावे आहेत. दोघेही अंबिकानगर येथील रहिवासी असून गुन्हा करण्याच्या हेतूने शस्त्र घेऊन फिरत असल्याचा संशय आहे. त्यांच्याकडून पिस्तूल व काडतुसांसह मोटारसायकल, मोबाईल असा एकूण 87 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलि आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पीएसआय किरण बार्‍हे व सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!