क्राइम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील तापी नदीच्या पुलावर आठ एप्रिलला एक दुचाकी उभी आढळली. दुचाकीसोबतच चपला, शर्ट आणि आधार कार्ड ठेवलेले पाकीट दिसून आले. आधार कार्डवरुन संपर्काचा प्रयत्न सुरु आहे.
सावळदे पुलाच्या फूटपाथजवळ हिरो एचएफ डिलक्स दुचाकी क्र.एमएच 19, डीडी 1533 आढळली. तिच्या शेजारी चपला, शर्ट व आधार कार्डचे पाकिटही होते. आधार कार्डवर पंकज शिवदास पाटील असे नाव असून त्याची जन्मतारीख एक जून 1978 अशी नोंदवलेली आहे. पोलिसांनी परिसरात संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे.