क्राइम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर शहरातील नाथनगरीत राहणार्या 18 वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सात एप्रिलला घडली.
प्राप्त माहितीनुसार, या विद्यार्थिनीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. राहत्या घरात तिचा मृतदेह आढळला. तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. आर्यानी विजयसिंग दाभाडे असे मृत मुलीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. शिरपूर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.