हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

एमपीचा गुटखा राज्यात कोणी आणला ?

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात गुटख्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतला. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड चेक पोस्टवर दोन एप्रिलला दुपारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत गुटखा आणि ट्रक असा एकूण 22 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गुटख्याची ट्रकमधून तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्यासहउपनिरीक्षक संदीप पाटील व सहकार्‍यांनी हाडाखेड येथील सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू केली. दुपारी संशयावरून पोलिसांनी मध्यप्रदेशातून धुळ्याकडे जाणार्‍या आयशर कंपनीच्या सहा चाकी ट्रक ( एचआर 55, एएल 0526) ला थांबवले.

ट्रकमधील मालाबाबत चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन सांगवी पोलिस ठाण्यात नेला. तेथे झडती घेतल्यानंतर महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध असलेल्या गुटख्याची खोकी आढळली. त्याबाबत धुळे येथील अन्न व औषध विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचित करण्यात आले. विभागाचे अधिकारी के.एच बाविस्कर यांनी सोमवारी (ता.3) सांगवी पोलिस ठाण्यात जाऊन जप्त मुद्देमालाची तपासणी केली. त्यात गुटख्याची 40 खोकी, प्रत्येक खोक्यात सहा बॅग, प्रत्येक बॅगेत पाच किलो गुटखा असल्याचे आढळले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक सुशीलकुमार अयोध्याप्रसाद (वय 24 वर्ष, रा. दिल्ली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त गुटख्याची किंमत 12 लाख तर ट्रकची किंमत 10 लाख रुपये आहे.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर आयुक्त किशोर काळे, प्रभारी डीवायएसपी अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट, उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलिस संदीप ठाकरे, संतोष पाटील, हवालदार योगेश मोरे, रणजित वळवी, मनोज पाटी यांनी ही कारवाई केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!