हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

..हे आहेत अमरीशभाईंचे उमेदवार !

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संचालकपदाच्या 18 जागांसाठी आजअखेर 61 र्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर आमदार अमरीशभाई पटेल गटातर्फे अधिकृत 15 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून दोन मतदारसंघातील उमेदवार माघारीच्या मुदतीनंतर जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
बाजार समितीच्या संचालकपदाच्या 18 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु असून 31 मार्चअखेर सात जणांनी अर्ज दाखल केले होते. अमरीशभाई पटेल गटातर्फे ऐनवेळी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने त्यांच्या यादीतील नावांबाबत उत्कंठा पसरली होती. विविध शक्यतांची चर्चा रंगली होती.

आ.अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील गटाचे उमेदवार असे,

सोसायटी मतदारसंघ : सर्वसाधारण : कांतीलाल दगा पाटील, किरण बद्रीनाथ गुजराथी, अरविंददास आनंदा पाटील, विठोबा सीताराम महाजन, शांतीलाल इंद्रसिंह जमादार, शिवाजी धनगर पाटील, चंद्रकांत (चंदू) धोंडू पाटील.

महिला राखीव : मेघा राजेंद्र पाटील, मनीषा राजकपूर मराठे.

इतर मागासवर्गीय : प्रसाद मोहन पाटील.

अनुसूचित जमाती : कृष्णा गेंदाराम पावरा.

ग्रामपंचायत मतदारसंघ : सर्वसाधारण : लक्ष्मीकांत बापूराव पाटील, आनंदसिंह दर्यावसिंह राऊळ.

आर्थिक दुर्बल घटक : मिलिंद दौलतराव बोरसे (पाटील).

अनुसूचित जाती-जमाती : जगन सुपा पावरा.

व्यापारी मतदारसंघ व हमाल मापाडी मतदारसंघाचे उमेदवार माघारीच्या नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे या गटातर्फे सांगण्यात आले.
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उमेदवारांसोबत माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, स्वीय सहायक अशोक कलाल आदि उपस्थित होते.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!