दुचाकी अपघातात युवक ठार
क्राइम ब्लास्ट ब्यूरो
भरधाव दुचाकी दगडाला धडकल्याने झालेल्या अपघातात युवक ठार झाला. हा अपघात महामार्गावर तेल्यादेव शिवारात घडला होता. मिठाराम पारखा पावरा (वय 35) असे मृताचे नाव असून तो रोहिणी येथील रहिवासी आहे. सुळे गावाचे पोलिस पाटील सीताराम पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मिठारामविरोधात अपघातासह स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.