क्राइम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर शहर आणि लगतच्या भागात मोटारसायकल चोरल्याच्या गुन्ह्यात शहर पोलिसांनी अव्वल कामगिरी बजावून सोनगीर गावातील रहिवाशी अट्टल चोरटा समाधान शामराव बाविस्कर (वय 22) व एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या दहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत साडेतीन लाख रुपये आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक ए.एस.आगरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 मार्चला वाघाडी गावातून सचिन माळी यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल चोरली गेली होती. डीबी पथक चोरट्यांचा शोध घेत होते. करवंद नाका परिसरात तपासणी करीत असतांना समाधान बाविस्कर व एक अल्पवयीन मुलगा यांना मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर दोघांनी मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीच्या दहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत साडेतीन लाख रुपये आहे. त्यातील चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे पोलिसांनी निष्पन्न केले.
एसपी संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अन्साराम आगरकर, हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, पोलिस नाईक मनोज पाटील, विनोद आखडमल, प्रशांत पवार, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, प्रवीण गोसावी, मुकेश पावरा, मनोज दाभाडे, सचिन वाघ, भटू साळुंखे, मिथून पवार, चेतन भावसार, शरद पारधी आदिंनी ही कारवाई केली.