क्राइम ब्लास्ट ब्यूरो
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी तीन दिवसांपासून संपावर गेलेल्या शासकीय कर्मचार्यांनी कामावर परत जावे. काम नाही, वेतन नाही या तत्वानुसार, त्यांची संपाच्या कालावधीतील गैरहजेरी विनावेतन धरली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिला आहे.
राज्यातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील शासकीय कर्मचारी 14 मार्च, 2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन करीत आहेत. या संपात धुळे जिल्ह्यातीलही तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी सहभागी झाले आहे. त्यामुळे शासकीय कामकाज सुरळीत पार पाडण्यास अडचणी निर्माण होत आहे. याकरीता जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संपात सहभागी असलेल्या सर्व तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्यांना जाहीर नोटीस जारी केली असून कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी या नोटीसीत म्हटले आहेत की, संपामध्ये सहभागी होऊन कार्यालयीन शिस्तभंग करणे ही आपली कृती महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नुसार असल्यामुळे आपण शिस्तभंग कार्यवाहीसाठी पात्र आहात, शासकीय कर्मचार्यांच्या संपामध्ये केंद्र शासनाचे काम नाही वेतन नाही हे धोरण राज्य सरकारनेही अनुसरले असल्याने आपला संप कालावधी विनावेतनसाठी गणला जाईल. तसेच आपण संपामध्ये भाग घेतलेला कालावधी हा सवेतील खंड कालावधीही गणला जाईल याची नोंद घ्यावी व नियमित कर्तव्यावर हजर होऊन शासकीय कामकाज सुरळीत पार पडण्यास सहकार्य करावे. वेळेअभावी सर्व संपात सहभागी कर्मचार्यांना ही जाहीर नोटीस काढण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे.