हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

तरडी येथे गळा आवळून खून

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

ओढणीने हात बांधल्यानंतर गळा आवळून पुरुषाचा खून केल्याची खळबळजनक घटना शिरपूर तालुक्यातील तरडी गावात घडली.
तरडी शिवारात गोविंद हिरालाल परदेशी यांचे गट नंबर 214 मध्ये शेत आहे. त्यात त्यांनी मक्याची लागवड केली आहे. 24 फेब्रुवारीला त्यांचे चुलतभाऊ मोतीलाल बाबूलाल परदेशी शेतात गेले होते. दुपारी बाराला त्यांना गोविंद परदेशी यांच्या शेतात अनोळखी पुरुष उताणा पडलेला दिसला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता तो मृत झाल्याचे दिसून आले.

परदेशी यांनी तातडीने थाळनेर पोलिस ठाण्यात माहिती दिली. थाळनेरचे सहायक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निरीक्षण केल्यावर मृताचे दोन्ही हात ओढणीने पाठीमागे बांधले असल्याचे दिसून आले. मृताला ओढणीने गळा आवळून ठार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मृत पुरुषाची ओळख पटू शकली नाही. त्याचा अन्यत्र खून करून मृतदेह लपवण्यासाठी शेतात फेकल्याचा संशय आहे. मृत कोण, कुठला, त्याचा खून कुठे झाला, कोणी केला असे अनेक प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित झाले आहेत. मोतीलाल परदेशी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!