हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

कर्ज फेडायला निघाला खरा…पण ?

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

स्टेट बँकेत कर्ज भरण्यासाठी जाणार्‍या प्रौढ नागरिकाच्या पिशवीला ब्लेड मारून 51 हजार रुपये चोरुन नेल्याची खळबळजनक घटना 22 फेब्रुवारीला दुपारी घडली. बोअर मशीनसह ट्रॅक्टर विकून संबंधिताने या रकमेची तजवीज केली होती.

शहरातील करवंद नाक्यावरील हुडको स्कीममध्ये अरुणावती बिल्डींगमध्ये राहणार्‍या सुधाकर विठ्ठल दोरीक यांच्यासोबत हा प्रकार घडला. 51 वर्षीय दोरीक यांचा बोअरिंग मशीनचा व्यवसाय होता. त्यासाठी त्यांनी स्टेट बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे दोरीक यांनी व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. बँकेचे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी बोअर मशीन व ट्रॅक्टर विकले. त्यातून मिळालेले 76 हजार 500 रुपये घेऊन ते 22 फेब्रुवारीला दुपारी स्टेट बँकेत जात होते. करवंद नाका येथून रिक्षात बसून गुजराथी कॉम्प्लेक्सजवळ उतरल्यानंतर त्यांना पिशवीला ब्लेडसारख्या धारदार हत्याराने कापल्याचे लक्षात आले.त्यांनी पिशवी उघडून पाहिली असता 51 हजार 500 रुपयांचे बंडल लंपास झाल्याचे आढळले. त्यांच्या शेजारी रिक्षात बसलेल्या महिलेने हे कृृत्य केल्याचा संशय आहे. शिरपूर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!