हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूरच्या इम्रानला पोलिसांनी का उचलला ?

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर शहरातील मोबाईल चोरीत नवा डॉन उदयास आल्याचे पोलिसांच्या कारवाईनंतर स्पष्ट झाले. मोबाईल चोरीच्या एका गुन्ह्यात संशयावरुन पोलिसांनी इदगाह नगरमधून इमरान शकील मलक (वय 32) याला उचलले आणि त्याच्याकडे चोरीचे सात मोबाईल आढळले. विशेष म्हणजे चोरी केलेल्या जागेपासून काही अंतरावरच मोबाईल विकण्याचा धंदा त्याने काढल्याचे निष्पन्न झाले.

शहरातील खंडेराव मंदीर येथे माघ शुद्ध पौर्णिमेपासून खंडेराव महाराजांची यात्रा भरली होती. तेथे पावभाजी विक्रीचा स्टॉल टाकलेल्या समाधान धुडकू धनगर याचा विवो कंपनीचा मोबाईल 18 फेब्रुवारीला चोरीस गेला होता. पोलिस या गुन्ह्याचा तपास करीत होते. पोलिस निरीक्षक ए.एस.आगरकर यांना तपासादरम्यान यात्रेत एकजण अगदी स्वस्तात मोबाईल विकत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या आदेशावरुन डी.बी.पथकाने इमरान शकील मलक (रा.इदगाह नगर) याला अलगद उचलले. त्याच्याकडे पावभाजीच्या दुकानावरुन चोरलेल्या मोबाईलसह चोरीचे एकूण सात मोबाइल आढळले. त्याची किंमत एकूण 36 हजार रुपये आहे. इमरान पहिल्यांदाच पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ए.एस.आगरकर, डीबी पथकाचे पीएसआय किरण बार्‍हे, हवालदार ललित पाटील, पोलिस नाईक मनोज पाटील, गोविंद कोळी, विनोद आखडमल, प्रवीण गोसावी, मुकेश पावरा, प्रशांत पवार, सचिन वाघ, आरीफ तडवी, होमगार्ड नाना अहिरे, चेतन भावसार, मिथून पावरा, शरद पारधी, राम भिल यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!