हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

नवरी उडाली फुर्रफुर्र..मोजून तिसर्‍या दिवशी !

क्राइम ब्लास्ट वृत्तसेवा

ताराबलम..चंद्रबलम म्हणून घरात आणलेली नवरी लग्नाच्या तिसर्‍या दिवशीच फुर्रकन उडून गेली. व्यथित झालेल्या तिच्या पतीने थाळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

शिरपूर तालुक्यातील सावेर गावात ही घटना घडली. तेथील अविनाश नगराज पाटील (वय 33) यांनी 15 फेब्रुवारीला स्नेहा (वय 23) हिच्यासोबत नाशिक येथे त्र्यंबकेश्वरमध्ये महादेवी मंदीर संस्थान येथे लग्न केले. तेथून ते रात्री दीडला सावेर येथे परत आले. 16 फेब्रुवारीला रात्री नऊला जेवण करुन घरातील सर्वजण झोपी गेले. 17 फेब्रुवारीला पहाटे पाचला नववधू स्नेहा अविनाश पाटील घरात कोणालाही न सांगता पळून गेल्याचे आढळले. अविनाश पाटील यांनी दिलेल्या माहितीवरुन थाळनेर पोलिस ठाण्यात बेपत्ता नोंद करण्यात आली आहे. हवालदार वळवी तपास करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!