हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपुरात नातलग युवतीवर बलात्कार

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

नात्याने मामेबहीण असलेल्या 19 वर्षीय युवतीवर युवकाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शहरातील करवंद नाका परिसरात घडली. संशयित युवकाला अटक करण्यात आली असून एका दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

पीडीत युवतीच्या आजोबांचे निधन झाल्यानंतर तेथे आयोजित धार्मिक कार्यक्रमांसाठी ती जात होती. तेथे तिचा चुलत आतेभाऊ कमलेश सुनिल जव्हेरी (वय 25, रा.वाल्मिकनगर, शिरपूर) हा देखील जात होता. 13 फेब्रुवारीला सायंकाळी साडेसातला त्याने गहू उपसण्याच्या बहाण्याने तिला वरच्या मजल्यावर बोलावले. तेथे जिन्यामध्ये तिच्यावर अत्याचार केला. घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास तुला जीवे मारुन टाकेल अशी धमकी दिली. तिने ही बाब कुटुंबातील लोकांना सांगितली. त्यांनी तडक पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरुन संशयित कमलेश जव्हेरीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली. कोर्टासमोर हजर केले असता त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!