क्राइम ब्लास्ट ब्यूरो
धावत्या बसमध्ये महिला कंडक्टरच्या अंगचटीला येऊन तिचा विनयभंग करणार्या आंबटशौकिनाला पोलिसांनी अटक करुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
विनयभंगाची घटना आठ फेब्रुवारीला दुपारी एक ते दीडच्या दरम्यान नाशिक-दोंडाइचा बसमध्ये घडली होती. बसमध्ये कंडक्टर म्हणून 32 वर्षीय महिलेची ड्यूटी होती. बस मालेगाव ते आर्वीच्या दरम्यान असतांना संशयित विलास रामदास मुसळे (वय 49 रा.गंगापूर रोड, धुळे) याने महिला कंडक्टरच्या शरीराला वारंवार हात लावून तिचा विनयभंग केला. तिने जाब विचारला असता वाद घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. महिला कंडक्टरने याबाबत वरिष्ठांना कळवले. त्यांनी पोलिसांना सूचित केल्यानंतर संशयिताला धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात विनयभंगासह शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक सागर काळे तपास करीत आहेत.