हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूरच्या विद्यार्थी आत्महत्येचा तिघांवर गुन्हा

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

व्याजाच्या दुष्टचक्रात अडकल्याने आत्महत्या केलेल्या शिरपूरच्या विश्वजीत राठोड या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणात अखेर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने घेतलेले पैसे व्याजासह परत करावे या कारणावरुन वारंवार धमकावल्याने त्याने आत्महत्या केल्याचे विश्वजीतच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे.

बीड जिल्ह्यात शिक्षक असलेले विनोद गोपीनाथ राठोड यांचा मुलगा विश्वजीत राठोड (वय 17) याने 26 जानेवारीला दुपारी सावळदे येथील पुलावरुन तापी नदीत उडी टाकून आत्महत्या केली होती. व्याजाच्या दुष्टचक्रात अडकल्याने त्याने आत्महत्या केल्याची चर्चा होती. त्याच्या वडिलांनी अंत्यविधी व त्यानंतरचे विधी आटोपून थाळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

संशयित भाग्येश शेखर भावसार, शेखर उर्फ विश्वास भावसार व भाग्येशची आई (तिघे रा.सुयश हॉस्पिटलमागे, करवंद नाका) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. त्यांच्याकडून विश्वजीतने 15 हजार रुपये व्याजाने घेतले होते. संशयितांनी त्या रकमेच्या व्याजावर व्याज लावले होते. ती रक्कम व्याजासह परत करावी अशा कारणावरुन तिघेही त्याला धमकावत होते. त्यांच्याकडून होणार्‍या छळामुळे विश्वजीतने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी ए.एस.आगरकर तपास करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!