हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

आमदाराचा पत्रकारांवर अब्रूनुकसानीचा गुन्हा

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

वर्तमानपत्रात रस्त्याची बातमी छापताना आपली प्रतिमा मलीन होईल असा मजकूर टाकून अब्रू नुकसान केल्याच्या संशयावरून शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश उदेसिंग पाडवी यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पाच पत्रकारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जानेवारीला संबंधित पत्रकारांनी आपल्या वर्तमानपत्रात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्या अधिनस्थ 3054 नगर विकास अंतर्गत विशेष रस्ता योजना विषयांकित क्रमांक सहा मधील प्रभाग 13 मधील रस्ता तयार करण्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे माझी विद्यमान आमदार म्हणून जनमानसातील प्रतिमा मलिन होईल याचा विचार न करता व  सत्यता पडताळणी न करता आपली मानहानी केली अशा आशयाची फिर्याद आमदार राजेश पाडवी यांनी पोलिसात दिली. त्यावरून पत्रकार अविनाश भामरे, रुपेश जाधव, रणजीत राजपूत, हर्षल सोनवणे आदिविरोधात भादंवि 499, 500, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार तपास करीत आहेत. अशा स्वरूपाचा हा अलीकडच्या काळातील पहिलाच गुन्हा असून त्याबाबत चर्चा सुरू आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!