हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

राहुल भोई खून प्रकरणात धक्कादायक खुलासा !

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

जिल्ह्यात खळबळ माजवणार्‍या शिरपूरच्या राहुल भोई खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील प्राथमिक संशयित म्हणून गुन्हा दाखल झालेल्या एकाचे नाव वेगळे असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यासोबतच या खून प्रकरणात संशयित म्हणून दहिवदच्या एकाला अटक करण्यात आली आहे.

चार फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहाला शिरपूर शहरातील क्रांतीनगर येथील भद्रा चौकात राहुल राजू भोई (वय 22) या युवकाचा खंजिराने वार करुन निघृण खून झाला होता. त्याच्या मृत्यूने संतप्त झालेल्या नागरिकांनी पाच फेब्रुवारीला शिरपूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तसेच शिंगावे येथील प्रमुख संशयित गणेश उर्फ भट्या सुभाष जगताप याच्या घरी जाऊन तोडफोडही केली होती. मृत राहुलचे वडील राजू भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांत सात संशयित व त्यांच्या अन्य सहकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयितांपैकी बंटी नितिन पाटील (वय 22) याला पोलिसांनी अटक केली. प्रमुख संशयित गणेश जगतापही पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांच्या फिर्यादीत कोहिनूर राजपूत नामक संशयिताचेही नाव होते. प्रत्यक्षात क्रांतीनगर भागातून पोलिसांनी कोहिनूर उर्फ समीर समद पिंजारी (वय 22) या युवकाला अटक केली आहे. त्यासोबतच दहिवद येथील स्मितनगरमध्ये राहणार्‍या हरिओम संजय सिंह (वय 19) यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याचे कळते. समीर पिंजारी आणि हरिओत सिंह यांच्या अटकेमुळे या खून प्रकरणात नवा ट्विस्ट तयार झाला असून नेमके काय घडले ते पोलिस तपासातून समोर येण्याची वाट नागरिक पाहत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!