हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

खून प्रकरणातील संशयिताच्या घरी तोडफोड

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर शहरात क्रांतीनगरमध्ये राहुल राजू भोई या 22 वर्षीय युवकाच्या खून प्रकरणातील प्रमुख संशयित गणेश उर्फ भट्या सुभाष जगताप याच्या शिंगावे येथील घरात जाऊन जमावाने तोडफोड केली. त्याच्या घरावर दगडविटांचा तुफान मारा करण्यात आला. गणेशचे कुटूंब आधीच घरातून निघून गेल्याने संभाव्य अनर्थ टळला.

राहुलच्या खुनातील संशयितांना फाशी द्यावी अशी मागणी करीत मृत राहुल भोईचे नातेवाईक व भोई समाजाने पाच फेब्रुवारीला शिरपूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. निवेदन दिल्यानंतर मोर्चामधील काहीजणांनी शिंगावे येथे गणेशच्या घरात जाऊन टीव्ही, फ्रीज आदि साहित्यांसह घराबाहेरच्या मोटारसायकलची तोडफोड केली. घरातील एका रुमममध्ये सोडून दिलेल्या कुत्र्याला पोलिसांनी बाहेर काढले. या घटनेनंतर जगतापच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

म्हणून झाला खून : राहुलचे वडील राजू गुलाब भोई यांनी शिरपूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात गणेश जगताप, दादा पाटील, विकी दत्तू पाटील, बंटी पाटील, मोहा उर्फ मोहित धाकड, दीपक धोबी, कोहिनूर राजपूत व इतर जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन वर्षापूर्वी राहुल व गणेश जगताप यांच्यात मोटारसायकलचा कट मारल्यावरुन वाद झाला होता. त्याबाबत समजूत घालण्यासाठी राजू भोई गेला असता त्यांनाही गणेशने मारहाण केली होती. तेव्हापासून गणेश मनात राग धरुन होता असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गणेश जगतापला चार नोव्हेंबरला रात्रीच अटक केली असून आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात त्यांना यश मिळाले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!